जागर शारदेचा रंग मेहंदीचा कार्यक्रम उत्साहात

12 Oct 2025 15:30:17
नागपूर,
Nagpur News भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्य तथा खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रमुख माया हाडे यांच्या आयोजनात “जागर शारदेचा, रंग मेहंदीचा” हा मेहंदी महोत्सव रंगतदारपणे पार पडला. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, शहराच्या महामंत्री वंदना शर्मा, महिला मोर्चाच्या वर्षा गोडबोले यांनी विशेष भेट देत उपस्थितांना प्रोत्साहन दिले.
 
Nagpur News
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता भावे, विनंती होटे, मनिषा डुबे, करुणा करांजकर, प्रणिता भालेराव, पल्लवी भालेराव, साधना बरबडे आणि इतर कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. Nagpur News एकूण ९० महिलांनी हातावर सुंदर मेंदी काढून घेतली, तर मेहंदी आर्टिस्टने आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्सद्वारे सर्वांचे मन जिंकले. हा उपक्रम माया हाडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुंदररीत्या पार पडला आणि कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सौजन्य: माया हाडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0