मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ हजाराची मदत

12 Oct 2025 18:12:38
वर्धा,
Navdurga Urban Co-op Society स्थानिक नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. यावर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीसह शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या काळात शेतकर्‍यांच्या मदतीकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेअंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सुपूर्द करण्यात आला.
 

Navdurga Urban Co-op Society 
अन्नदाता असलेल्या शेतकर्‍यांवर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट ओढवले. पुरामुळे शेती खरडून गेली, पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने पीक परिस्थिती गंभीर झाली. अनेकांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. अशावेळी शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी व त्या मदतीत आपलाही सहभाग असावा, याकरिता नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना २१ हजार रुपयांचा धनादेश सहाय्यता निधीकरिता प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद भालतडक, उपाध्यक्ष अनंत वानखेडे, सचिव शरद चौधरी, माजी अध्यक्ष संजय वानखेडे, प्रा. दुर्गा धुरत, श्याम देशमुख, दिलीप जवळेकर, हेमंत दाते, प्रकाश बमनोटे, अविनाश देशमुख, टी. सी. राऊत व इतर संचालक यावेळी उपस्थित होते. संस्थेने सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल पालकमंत्री पंकज भोयर यांनी नवदुर्गा नागरी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले. 
Powered By Sangraha 9.0