अफगाण परराष्ट्रमंत्र्यांची आणखी एक पत्रकार परिषद; यावेळी महिलांना मिळाला प्रवेश

12 Oct 2025 14:37:54
नवी दिल्ली,  
pc-by-afghan-foreign-minister भारत दौऱ्यावर आलेल्या अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी महिला पत्रकारांवरील कथित बंदीविषयी निर्माण झालेल्या वादानंतर मोठे पाऊल उचलले आहे. तालिबान सरकारचे हे परराष्ट्रमंत्री आता आणखी एक पत्रकार परिषद घेणार आहेत, ज्यामध्ये महिलांनाही प्रवेश देण्यात आला आहे.
 
pc-by-afghan-foreign-minister
 
मागील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना जाणूनबुजून रोखण्यात आले नाही, असे तालिबान सरकारने स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या परिषदेत फक्त दूतावासातील अधिकारी आणि काही निवडक पत्रकारांनाच आमंत्रित करण्यात आले होते. या प्रकरणावर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका सुरू केली होती. pc-by-afghan-foreign-minister त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देत सांगितले की, त्या पत्रकार परिषदेशी भारताचा काहीही संबंध नव्हता.
दरम्यान, अफगाण परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांचा आग्रा दौरा रद्द करण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते रविवारी ताजमहालाला भेट देण्यासाठी येणार होते. नियोजनानुसार, सकाळी ११ वाजता ते ताजमहालात पोहोचून एक तास दर्शन घेणार होते आणि त्यानंतर आग्र्यातील भोजनानंतर दिल्लीला परत जाणार होते. pc-by-afghan-foreign-minister मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या प्रोटोकॉल विभागाने मुत्ताकी यांच्या आग्रा भेटीच्या रद्द झाल्याची पुष्टी केली आहे. शनिवारी मुत्ताकी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे स्थित दारुल उलूम देवबंद मदरशाला भेट दिली होती, जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0