तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Rashtriya Swayamsevak Sangh ब्रिटिशकाळात संघ जन्माला आला तो डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मजात राष्ट्रभक्तीतून 800 वर्षांच्या गुलामीतसुद्धा अनेक संत आणि हेडगेवारांसारख्या महापुरुषांनी भारतीय संस्कृती टिकवून ठेवली अन्यथा भारतावर सांस्कृतिक राजकीय आणि व्यापाराचे निमित्त करून अनेक आक्रमणे झाली त्यात भारतीय संस्कृतीवर टिकली नसती, असे मत मुख्य वक्ता सुनील देसाई यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या 70 मिनिटांच्या भाषणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
राळेगाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव भाऊसाहेब कोल्हे सभागृहाच्या प्रांगणात झाला. यावेळी संघाचे पश्चिम क्षेत्र शारीरिक प्रमुख सुनील देसाई बोलत होते. यावेळी मंचावर तालुका संघचालक भूपेंद्र कारिया, प्रमुख पाहुणे डॉ. हेमंत गलाट होते. सुरुवातीला दंड, योगासने, सामूहिक गीत, सुभाषित, अमृतवचन, वैयक्तिक गीत झाले.
तालुका संघचालक भूपेंद्र कारिया यांनी संघाचा 100 वर्षांचा इतिहास भाषणातून मांडला. डॉ. हेमंत गलाट यांनी शतक महोत्सवी वर्षात आपल्याला या मंचाचा भाग केल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमासाठी राळेगाव आणि परिसरातील हजारो महिला व नागरिकांची उपस्थिती होती.