साईंच्या पादुकांची विदर्भवारी, बुधवारी वर्धेत दाखल

12 Oct 2025 19:52:39
वर्धा,
Shirdi Sai Paduka Vidarbhari साईभतांच्या आग्रहास्तव शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्रींच्या मूळ पादुका दर्शनासाठी विदर्भात फिरवल्या जात आहे. बुधवार १५ रोजी श्रींच्या पादुका वर्धेत दाखल होणार वंजारी चौक ते साई मंदिर पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती श्री साई सेवा मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल व्यवहारे यांनी आज रविवार १२ रोजी साई मंदिरात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 

Shirdi Sai Paduka Vidarbha, Sai Paduka Vardha arrival, Sai Baba Paduka procession, Sai Paduka Darshan Vardha, Shri Sai Seva Mandal event, Sai Paduka 2025 Vardha, Sai Baba pilgrimage Vidarbha, Sai Paduka Vardha palanquin, Sai temple Vardha, Sai Bhakt Vidarbha, Sai Paduka darshan timings, Sai devotional program Vardha, Sai Paduka procession band, Sai Bhajan Mandal, Sai service volunteers, Sai Paduka Vardha celebrations, Sai Paduka welfare arrangements 
विठ्ठल व्यवहारे पुढे म्हणाले की, साईबाबांनी वापरलेल्या पादुका शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तांच्या अधिनस्त आहेत. या पादुकांचे विदर्भातील साईभतांना दर्शन घेता यावे, याकरिता विदर्भात श्रींच्या मूळ पादुका फिरवल्या जात आहे. वर्धेत बुधवारी या पादुकांचे शुभागमन होत आहे. १५ ऑटोबर १९७५ साली पहिल्यांदा वर्धेत पादुका आणल्या होत्या. त्यावेळी भतांच्या उपस्थितीत मोठा उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर १९७८ तर २०२१ रोजी श्रींच्या पादुकांचे शहरात आगमन झाले होते. यंदा चौथ्यांदा श्रींच्या पादुका वर्धेत येणार आहे. १९७५ सालानंतर २०२५ रोजी १५ ऑटोबरलाच श्रींच्या पादुका वर्धेत येणार असून हा शुभ योग असल्याचेही व्यवहारे म्हणाले.
 
 
श्रींच्या पादुका विदर्भात फिरत असताना शिर्डी संस्थानचे पुजारी, भालदार, चोपदार व सुरक्षा कर्मचारी अशा २२ लोकांची चमू सोबत आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने व्यवस्थेची पाहणी केली असून काटेकोर नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे श्री साई सेवा मंडळ व श्री साई भत परिवार वर्धाच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भतांची गैरसोय टाळण्यासाठी ५० ते ६० स्वयंसेवकांची चमू तयार केली आहे. वृद्ध, अपंगांसाठी वेगळी व्यवस्था असून त्यांच्यासाठी प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
 
 
बुधवारी सकाळी १० वाजता पादुका वर्धेत पोहचल्यानंतर वंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी बॅण्ड पथक, लेझिम आणि भजन मंडळांचा सहभाग असणार आहे. सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत साई मंदिरात पादुका दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सायंकाळी मंगेश अंदुरकर यांचा साई संध्या गायनाचा कार्यक्रम होईल. पादुका दर्शन सोहळ्याकरिता जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनाही दर्शनस्थळी आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साईभतांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल व्यवहारे यांनी केले आहे.
 
 
 
पत्रपरिषदेला श्री साई सेवा मंडळाचे सचिव सुभाष राठी, अध्यक्ष घनश्याम सावळकर, अरूण काशीकर, चंद्रशेखर राठी, अटल पांडे, अरूण काशीकर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0