माळगी नगरमध्ये शिवदौड मॅरेथॉन

12 Oct 2025 16:47:14
नागपूर,
Malgi Nagar शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने दक्षिण नागपूर प्रभाग २९ व ३४ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक विशाल कोरके व धम्म भाऊ सोनटक्के यांच्या आयोजनात माळगी नगर येथे भव्य शिवदौड मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थी, स्थानिक मुलं-मुली तसेच वरिष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
 
 
Malgi Nagar
 
उसकेलवार आयटीआय, आदर्श संस्कार शाळा, आर्य कॉन्व्हेंट, साकेत कॉन्व्हेंट, निंबाळकर स्कूल, मेजर हेमंत जकाते शाळा, मातोश्री मुळे व सर्वशी माध्यमिक शाळा यांचे सुमारे १५०० ते १७०० विद्यार्थी सहभागी झाले. Malgi Nagar स्पर्धा सुरू करण्यासाठी जिल्हाप्रमुख सुरज गोजे, शहर संघटिका निलिमा शास्त्री आणि समीर शिंदे यांनी फ्लॅग दाखवून मॅरेथॉनला सुरूवात केली.
 
विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना २२२२, ११११, ७७७ रुपये, ट्रॉफी व सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. विजेत्यांना हे पारितोषिक आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते देण्यात आले. Malgi Nagar या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किशोर रंदई, उज्वला उमरे, नलिनी सदावरती, किरण शेळके, जनता देवगिरकर, अक्षय अनकर, मंगेश देवगिरकर, विनोद चकोर आणि शैलेश काशीकर यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य: महेन्द्र वैद्य /  देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0