राज्य व केंद्राच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा : रणधीर सावकर

12 Oct 2025 17:05:14
मानोरा,
state and central government schemes, दूरदृष्टी असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रत्येक नांगरिकांच्या बॅक खात्यात अनुदानाची रक्कम पाठविली. तसेच आज जलजीवन मिशनअंतर्गत शुद्ध जल मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांनीही महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ५ लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जनतेचे विज बील शुन्यापर्यंत आणण्याच काम सुरु आहे. अशा विविध योजना केंद्र व राज्यशासन राबवित असून त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम झालं पाहिजे, असे प्रतिपादन विधानसभा प्रतोद तथा भाजपा प्रदेश संघटन मंत्री रणधीर सावरकर यांनी आज, १२ ऑक्टोबर रोजी आ. सईताई डहाके यांच्या मानोरा शहरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केले.
 

मानोरा, state and central government schemes,  
कार्यक्रमाच्या सुरवातीला आ. सईताई डहाके यांच्या मानोरा शहरातील जलसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर आ. श्याम खोडे आ. सईताई डहाके पुरुषोत्तम चितलांगे, राजु पाटील राजे, राजीव काळे, दत्तराज डहाके, सुरेश गांवडे, महादेव ठाकरे, भक्तराज महाराज, अरविंद इंगोले, रवी पखमोडे, गणेश जाधव व सीमा राठोड व आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सावरकर म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांचे कापूस व सोयाबीन या मुख्य पिकाची आधारभुत किंमत केंद्र शासनाने वाढविली असून लवकरच नाफेडद्वारे सोयाबीन व सीसीआयद्वारे कपाशीच्या खरेदीला सुरुवात होणार आहे. लोकप्रतिनिधी व सामान्य जनतेमधील संवाद साधण्यासाठी कार्यालयामार्फत सामान्य नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्याच काम भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी राजुपाटील राजे, भक्तराज महाराज, पुरुषोत्तम चितलांगे, दत्तराज डहाके, आ. शाम खोडे, आ. सई डहाके यांचीही भाषणे झाली.
Powered By Sangraha 9.0