उमरखेड नप मतदार यादीत

12 Oct 2025 19:13:12
विजय आडे
उमरखेड,
Umarkhed municipal election नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मतदार यादीतील प्रचंड गोंधळामुळे मतदार आणि इच्छुक उमेदवार दोघांच्याही डोक्याला हात लागला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर तफावत आणि चुका झाल्याचे उघड झाले असून अनेक मतदार वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

Umarkhed municipal election 
एकाच कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या प्रभागांत
नगर परिषदेच्या 2022 मधील मतदार यादीप्रमाणे प्रभाग 1 ते 13 या सर्व गटांची विभागणी स्पष्ट होती. मात्र, यावर्षीच्या यादीत त्याच गटांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. एका प्रभागातील कुटुंबातील मतदार अन्य प्रभागाच्या यादीत तर काही ठिकाणी तीन ते चार पृष्ठांंवरील मतदार इतर प्रभागांत गेले आहेत.उदाहरणार्थ, प्रभाग 2 मधील मतदार प्रभाग 4 मध्ये, प्रभाग 12 मधील मतदार 11 व 13 मध्ये, तसेच प्रभाग 7 मधील मतदार 1 व 2 मध्ये समाविष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
लोकसंख्येत तफावत : हजारो मतदार वाढले किंवा कमी झाले
2022 आणि 2025 या दोन याद्यांतील प्रभागनिहाय लोकसंख्येची तुलना केल्यास काही प्रभागात दीड हजारापर्यंत मतदार वाढले आहेत. तर काही ठिकाणी मतदारसंख्या कमी झालेली दिसते. या विसंगतीमुळे मतदार यादी तयार करताना गंभीर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
 
 
घराघरात गोंधळ : एकाच कुटुंबाचे मत वेगवेगळ्या प्रभागांत
काही ठिकाणी एकाच घरातील नवèयाचे नाव एका प्रभागात, तर बायकोचे दुसèया प्रभागात, मुलाचे तिसèया तर दुसèया मुलाचे चौथ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून अधिकाèयांनी मतदारांची चेष्टा केली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
या सर्व गोंधळावर तहसीलदार, मुख्याधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


नागरिक व पक्षांनी कामाला लागावे
प्रत्येक प्रभागातील मतदार यादीत बाहेरील मतदारांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. हे चुकीचे नावे शोधून काढणे आणि दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य दुरुस्ती झाली नाही, तर निवडणुकीचा निकालच प्रभावित होईल. नागरिकांनी व पक्षांनी याबाबत तत्काळ कामाला लागले पाहिजे.
महेश काळेश्वरकर,
नागरिक उमरखेड
 
 
चौकशीची मागणी तीव्र
 
 
नगर परिषदेने 2022 मध्ये व्यवस्थित यादी तयार केली होती. मात्र, 2025 च्या यादीत नव्या नावांची केवळ पुरवणी जोडायची असताना संपूर्ण प्रभागांची उलथापालथ झाल्याचे दिसते. त्यामुळे ही तफावत हेतुपुरस्सर करण्यात आली का शंका निर्माण झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाèयांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
मुख्याधिकारी ‘नॉट रिचेबल..’
 
 
या मतदार यादीतील घोळ संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्याशी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवरून सातत्याने प्रयत्न केले, पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
Powered By Sangraha 9.0