दक्षिण आफ्रिकेत बस दरीत कोसळल्याने ४२ ठार

13 Oct 2025 13:48:37
प्रिटोरिया,
42 killed in South Africa दक्षिण आफ्रिकेतील एका पर्वतीय प्रदेशात बस अपघात झाला असून किमान ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी समोर आली आहे. हा अपघात राजधानी प्रिटोरियापासून सुमारे ४०० किलोमीटर उत्तरेस असलेल्या लुईस ट्रायकार्ड्ट शहराजवळील एन1 महामार्गावर घडला. तसेच मृतांचा आकडा वाढू शकतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बस एका उंच डोंगराळ खिंडीजवळ रस्त्यावरून घसरून दरीत पडल्यामुळे हा अपघात झाला.
 
 
 
42 killed in South Africa
बस दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व केप येथून देशाच्या दक्षिणेकडे जात होती. लिम्पोपो प्रांतीय सरकारच्या माहितीप्रमाणे, प्रवासी झिम्बाब्वे आणि मलावीचे नागरिक असल्याचे मानले जात आहे, जे त्यांच्या मायदेशी परतत होते. जखमींची संख्या अद्याप निश्चित नाही, परंतु अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करत सांगितले की, हा अपघात रस्ते सुरक्षेवर विशेष भर देणाऱ्या वार्षिक वाहतूक महिन्यादरम्यान घडल्याने दुःख अधिक आहे. गेल्या वर्षीही लिम्पोपो प्रांतात एका बस अपघातात ४५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी बस पुलावरून घसरून दरीत कोसळली होती आणि फक्त एक ८ वर्षांची मुलगी वाचली होती. त्या बसमध्ये प्रामुख्याने बोत्सवाना नागरिक होते जे दक्षिण आफ्रिकेतील ईस्टर चर्च सेवेसाठी जात होते.
Powered By Sangraha 9.0