मुंबई,
alliance-with-thackeray-brothers बिहारमध्ये कोण लहान भाऊ आणि कोण मोठा हा प्रश्न कालच निकाली निघालेला असताना, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंशी युती न करण्याची गळ हाय कमांडला घातल्याचे वृत्त आहे. बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत किंवा महाविकास आघाडी म्हणून न लढता आपण स्वबळावरच लढायचे, असा आग्रह काँग्रेस नेत्यांनी धरल्याचे वृत्त आहे.
ठाकरेंशी काँग्रेसने युती केल्याचा फायदा फक्त त्यांनाच होईल आणि काँग्रेसला मात्र मत विभाजनाचा तोटा होईल, असे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. alliance-with-thackeray-brothers मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांताक्रुझमधील गॅलेक्सी हॉटेलमध्ये आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि ज्योती गायकवाड हे नेते उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या महराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत काँग्रेसची ‘नो कॉम्प्रमाईज’ अशी स्पष्ट भूमिका राहणार आहे. alliance-with-thackeray-brothers मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात महराष्ट्रातील नेते फारसे अनुकूल नाहीत. ठाकरे बंधूंना सोबत घेतल्यास अल्पसंख्याक मतदार काँग्रेसपासून दूर जातील. मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत न होता पूर्ण ताकदीने निवडणूक लढवावी, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे मत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे, बीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे, काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.