२०४४ पर्यंत युरोप नष्ट तर रोममध्ये खलिफाचे राज्य!

13 Oct 2025 10:01:50
बल्गेरियन,
Baba Vanga's predictions बल्गेरियन गूढवादी बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, २०४३ पर्यंत रोमच्या मध्यभागी एक खलिफाचे राज्य स्थापन होईल. त्यानंतर २०४४ पर्यंत युरोपची संपूर्ण लोकसंख्या नष्ट होईल आणि हा खंड जवळजवळ ओसाड आणि निर्जन होईल, असे वेंगाच्या भाकीत आहे. बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये उत्तर मॅसेडोनियामध्ये झाला. बाल्यावस्थेत वादळामुळे दृष्टी गमावली आणि त्यानंतर त्याभविष्यातील घटनांचे भाकीत करण्यास सक्षम झाल्या. त्यांची कीर्ती इतकी मोठी होती की बल्गेरियाचे राजा बोरिस तिसरे आणि सोव्हिएत नेते लिओनिड ब्रेझनेव्ह यांनीही त्यांचा सल्ला घेतला.
 
 
Baba Vanga
 
वेंगा यांनी भाकित केले की, २०१० मध्ये अरब स्प्रिंगसह संघर्ष सुरू होईल, सीरिया येथे मुस्लिम युरोपियन लोकांविरुद्ध रासायनिक युद्धाचा वापर करतील, आणि २०१६ मध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतीचे प्रादुर्भाव युरोपमध्ये पाहायला मिळेल. तसेच त्यांच्या भाकितानुसार, २०४४ च्या अखेरीस युरोप आज आपल्याला माहित असलेल्या स्वरूपात राहणार नाही. संपूर्ण लोकसंख्या नष्ट झाल्यानंतर हा खंड जवळजवळ रिकामा आणि जीवनापासून विरहित पडीक जमीन बनलेला असेल. बाबा वेंगा यांना “बाल्कनचे नोस्ट्राडेमस” म्हणूनही ओळखले जात होते. त्यांचे खरे नाव व्हेंजेलिया पांडेवा दिमित्रोवा आहे आणि त्यांच्या भविष्यवाण्या अनेक जण खऱ्या ठरल्याच्या दाव्यानुसार प्रसिद्ध आहेत.
Powered By Sangraha 9.0