नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करिअर कट्टा” उपक्रमांतर्गत करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. संदीप धोटे (शाखाप्रमुख, स्पेक्ट्रम अकॅडमी, नागपूर) उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना कहाळे-पत्की आणि निलेश ढोमणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. त्यानंतर सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख वक्ते प्रा. संदीप धोटे यांनी स्पर्धा परीक्षांविषयी माहितीपूर्ण सादरीकरण (PPT द्वारे) सादर केले. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना आपल्या कौशल्यांचा योग्य उपयोग करून योग्य दिशा निवडण्याचा सल्ला दिला. प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “आजच्या युगात करिअरच्या संधी अमर्याद आहेत; फक्त योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक आहे. Ramakrishna Wagh College ” या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ आणि संचालिका प्रा. लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सायली लाखे-पिदळी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. पूनम मेश्राम यांनी केले, तर प्रा. संजय पाठक यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. संपूर्ण कार्यक्रम प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सौजन्य: सायली लाखे पिदळी, संपर्क मित्र