कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात मोठी कारवाई, श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी ईडीचे छापे

13 Oct 2025 09:14:44
चेन्नई,
coldrif-cough-syrup-case कोल्ड्रिफ सिरप प्रकरणात कारवाई तीव्र झाली आहे. सोमवारी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) श्रीसन फार्माशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. मध्य प्रदेशात या विषारी कफ सिरपमुळे २० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
 
coldrif-cough-syrup-case
 
सध्या तपास सुरू आहे. श्रीसन फार्मा या सिरप उत्पादक कंपनीचे मालक जी. रंगनाथनला अटक करण्यात आली आहे. चेन्नई कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणासंदर्भात ईडीने पीएमएलए अंतर्गत तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील श्रीसन फार्माच्या सात ठिकाणी छापे टाकले आहेत. coldrif-cough-syrup-case उल्लेखनीय म्हणजे, या छाप्यांमध्ये तामिळनाडू औषध नियंत्रण कार्यालयाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या ठिकाणांचाही समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0