आनंदी आनंद गडे...शाळांमध्ये दिवाळी व उन्हाळी सुट्ट्या जाहीर

13 Oct 2025 16:20:06
मुंबई, 
Diwali holidays in schools दिवाळी हा सण मुलांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. यंदा शालेय विभागाने दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यंदा जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सणासाठी १६ ऑक्टोबर २०२५ पासून २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १२ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मंगळवार २८ ऑक्टोबरपासून पुन्हा शाळा सुरू होतील. दिवाळीच्या सणाच्या तारखांबाबत सांगायचे झाले, तर वसुबारस १७ ऑक्टोबरला असेल तर भाऊबीज २२ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये सत्र परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी योग्य तयारी करणे आवश्यक आहे.
 
 
Diwali holidays in schools
 
उन्हाळी सुट्ट्या यावर्षी २ मे २०२६ पासून १३ जून २०२६ पर्यंत राहणार आहेत. त्यापूर्वी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील. Diwali holidays in schools महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाचवेळी घेण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवसांचे अध्यापन सुनिश्चित होईल. दिवाळीनंतर, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये होणार आहेत. या काळात शिक्षकांना निवडणुकीसाठी मनुष्यबळ म्हणून काम करावे लागणार आहे, याबाबत शालेय विभागाने शाळांना पूर्वसूचना दिली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी या तारखांची नोंद करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून अभ्यास आणि सुट्ट्यांचा योग्य समतोल राखता येईल.
Powered By Sangraha 9.0