डाॅ. समीर पालतेवारच्या अडचणी वाढल्या

13 Oct 2025 13:40:27
अनिल कांबळे


नागपूर,


Dr. Sameer Paltewar, शहरातील नामांकित मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी रुग्णालयाचा संचालक डाॅ. समीर पालतेवारला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्याच्या विराेधात सीताबर्डी पाेलिसांनी अजून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रामदासपेठच्या मेडिट्रीना रुग्णालयात झालेल्या 16.83 काेटींच्या घाेटाळ्यात सध्या पालतेवार अटकेत आहे.
 
 

Dr. Sameer Paltewar, Meditrina Hospital Nagpur 
आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या 5 ऑक्टाेबर राेजी पालतेवारला अटक करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे पालतेवार दाम्पत्यासह या घाेटाळ्यात सामील 13 आराेपींचा अंतरिम जामीन अर्ज सत्र न्यायालयाने ेटाळला हाेता. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा (ईओडब्ल्यू)ने रुग्णालयाचे भागीदार गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून डाॅ. पालतेवारसह 17 जण व फर्मविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नाेंदविला हाेता. इतर आराेपींमध्ये रुग्णालयाचा लेखापाल अर्पण किशाेर पांडे, किशाेर विनायक पांडे, अभिषेक किशाेर पांडे, अ‍ॅबस्ट्रॅक्ट आयटी ग्रूपचा भागिदार आकाश मधुकर केदार, रिता मुकेश बडवाईक, वैशाली रामदास बडवाईक, तृप्ती प्रकाश घाेडे, एम.एस.सेवा हेल्थकेअरचा संचालक सर्वेश ढाेमणे, प्रियंका सर्वेश ढाेमणे, 16 अलाईड हेल्थ केअर सर्व्हीसेसची संचालक कल्याणी बडवाईक आणि नईम दिवानी याचा समावेश आहे. यापूर्वी, 23 सप्टेंबर 2025 राेजी ही या आराेपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन देखील ेटाळण्यात आला हाेता.
असे आहेत आराेप
शासकीय याेजनांमधून रुग्णालयाला येणारा निधी हा जाणूनबुजून ’ऑब्वीयेट हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ या बाेगस कंपनीच्या खात्यात वळवण्यात आला. ही कंपनी पालतेवार कुटुंबीयांचीच असून, ती केवळ कागदाेपत्री अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा व्यवहार 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पार पडल्याचा आराेप आहे. महात्मा ज्याेतिबा ुले जनआराेग्य याेजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआराेग्य याेजना अंतर्गत उपचार केलेल्या रुग्णांच्या बिलांचा निधी या शेल कंपनीच्या खात्यात वळवण्यात आला, असा आराेप आहे.
Powered By Sangraha 9.0