एक्स्प्रेस ट्रेनमध्ये कोट्यवधींचा सोन्याचा साठा उघड

13 Oct 2025 19:24:37
नागपूर,
express train दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) बिलासपूर–इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेस (गाडी क्र. १२८५५) मधून अवैधरीत्या वाहतूक होत असलेले ₹३ कोटी ३७ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे सोने आणि चांदी जप्त केले. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी आमगाव–गोंदिया दरम्यान करण्यात आली.
 

sona  
 
विशेष टास्क फोर्सच्या तपासणीत नरेश पंजवानी (वय ५५, गोंदिया) नावाचा प्रवासी मौल्यवान धातूसह आढळला. त्याच्याकडून २.६८ किलो सोने आणि ७.४४ किलो चांदी जप्त करण्यात आली. express train एकूण मालाची किंमत ₹३.३७ कोटी असून तो डीआरआय नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आला. धंतोऱस दिवाळीपूर्वी रेल्वेतील अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
 
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0