एबीव्हीपी माजी अध्यक्ष जितेंद्र बिष्ट यांचा अपघातात मृत्यू!

13 Oct 2025 11:02:19
डेहराडून,
Jitendra Bisht's death एबीव्हीपीच्या माजी अध्यक्ष जितेंद्र सिंह बिष्ट यांचे अपघातात निधन झाले. शिमला बायपास रोडवरील सेंट ज्यूड्स स्कूलजवळ भरधाव कारने त्यांना धडक दिली, तर त्यांच्या मित्र हृतिक गंभीर जखमी झाले आहेत. हृतिक यांना उपचारासाठी वेलमेड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आरोपी कारचालक पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी वर्कशॉप मालक वसीम याला ताब्यात घेतले असून आयएसबीटी चौकीत त्याची चौकशी सुरू आहे.
 
 
 
Jitendra Bisht
केशव विहार चंद्रबानी येथील रहिवासी जितेंद्र बिष्ट हे सेंट ज्यूड्स चौकाजवळ श्री गणेश प्रॉपर्टी नावाचे कार्यालय चालवायचे. मित्र वासू कसानाचा वाढदिवस असल्याने मित्र मंडळी कार्यालयात एकत्र जमली होती. रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास केक कापल्यानंतर मित्र ऑफिसबाहेर गप्पा मारत असताना, सेंट ज्यूड्स चौकातून ट्रान्सपोर्ट नगरकडे भरधाव निसान मायक्रा कार आली आणि मित्रांना धडक दिली. जितेंद्र बिष्ट कारखाली चिरडले गेले, तर हृतिक जखमी झाले, इतर मित्र थोडक्यात वाचले. चालक घटनास्थळावरून पळून गेला.
Powered By Sangraha 9.0