दुचाकी चोरट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

13 Oct 2025 18:41:42
रिसोड,
motorcycle theft risod गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हददीतून मोटार सायकल चोरी जाण्याच्या घटना घडल्याने पोलिस स्टेशन रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी. बी. पथकास मार्गदर्शन करून चोरांचा शोध घेवून मोटार सायकल हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

motorcycle theft risod
डी.बी. पथकाने तांत्रिक व आधुनिक पध्दतीने तपास करून व मिळालेल्या गुप्त माहितीवरून १२ ऑटोबर रोजी संशयित इसम सचिन उर्फ मिठठू अशोक मानकर रा. रामनगर, ता. रिसोड, यास ताब्यात घेवून त्यास चोरी गेलेल्या मोटार सायकलीबाबत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने वाशीम व हिंगोली जिल्ह्यातून मोटार सायकली चोरी केल्याची कबूली दिली. त्यानंतर उपरोक्त आरोपीकडूनन याचेकडून पोलिस स्टेशन रिसोड व वाशीम शहर इत्यादी ठिकाणच्या एकूण ९ मोटार सायकल किंमत ८ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक नवदिप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली डी. बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलिस हवालदार प्रशांत राजगुरू, महादेव चव्हाण, आशिष पाठक, पोलिस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोने, सुनिल तिवाले, अमोल ठाकरे, विश्वास चव्हाण तसेच सायबर सेलचे संदीप वाकूडकर यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0