पाच वर्षात 457 जणांचा रस्ते अपघातात बळी

13 Oct 2025 13:54:36
अनिल कांबळे


नागपूर,
Nagpur road accidents वाहतुकीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे दिवसेंदिवस रस्ते अपघातात वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघात जड वाहनांमुळे शहरात 422 अपघात झाले. यात 457 लाेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात 563 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कायमचे अपगंत्व आले आहेत. यादरम्यान घडलेल्या 180 अपघातात 247 जण लाेक किरकाेळ जखमी झाले. त्यामुळे, जड वाहतुकीला शहरात ‘नाे एन्ट्री’ असणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
 
 

Nagpur road accidents
अन्य राज्यातून किंवा शहरातून उपराजधानीत हाेणारी वाहतूक वाढत्या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे सांगत नागपूर शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त लाेहित मतानी यांनी शहरातून जड वाहतुकीला बंदी घातली आहे. याबाबतचे परिपत्रक त्यांनी जारी केले. त्यामुळे, बाहेरून येणारी वाहतूक ही आऊटर रिंगराेडच्या मार्गाने शहराबाहेरून प्रवास करतील तर शहरात आवश्यक जड वाहतुकीलाही प्रतिबंध घालण्यात आला आहे. शहराबाहेरून नागपूर मार्गाने दुसèया स्थानावर जाण्यासाठी आऊटर रिंगराेड असतानाही याचा वापर न करता ही वाहतूक शहरातील अंतर्गत मार्गांवरून हाेत आहे. यामुळे शहरात अपघातांची संख्या वाढत आहे. मागील पाच वर्षांतील अपघात बघता जड वाहनांमुळे शहरात 422 अपघात झाले असून यात 457 लाेकांचा बळी गेला आहे. शहर पाेलिसांनी जारी परिपत्रकात विविध मार्गांनी शहराच्या दिशेने हाेणारी जड वाहतूक आऊटर रिंगराेडच्या कुठल्या मार्गाने वळवावित याबाबत नमूद केले आहेत. तसे असले तरी शहरातील औद्याेगिक क्षेत्रातून जड वाहतूक हाेणार आहे. मात्र, या वाहतुकीलाही वेळेचे बंधन घालण्यात आले आहेत. जबलपूर व भंडाराकडून एमआयडीसी कडेे येणारी जड वाहने कापसी ओव्हर ब्रिज, जामठा उड्डाणपुल, झिराे सर्कल अमरावती मार्गावरील गाेंडखैरी टी-पाॅइंन्ट येथून उजवे वळण घेऊन सरळ वाडी टी-पाॅइंन्ट येथून उजवे वळण घेऊन सरळ मागार्चा वापर करतील. तर या वाहनांना शहर हद्दीत प्रवेश करण्याकरिता सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 10 वाजतापर्यंत वाहतूक करण्यास मनाई असेल. अशाचप्रकारे अजनीतील भारतीय खाद्य निगम गाेदाम, संत्रा मार्कट तसेच शासकीय गाेदाम येथे हाेणारी जड वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

शासकीय वाहनांवरही नियम
 
 
 
 
शासकीय कामात गुंतलेल्या जड वाहन चालकांनी संबंधित कार्यालयीन प्रमुखाचे मूळ स्वरूपातील प्रमाणपत्र बघावे. वाहनावर ‘ऑन गव्हरमेंट ड्युटी’चा फलक लावण्याची अट आहे. तसेच दुध, पेट्राेल, डिझेल, केराेसीन, गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा शहरात पुरवठा करणारी जडवाहने फक्त आऊटर रिंग राेडचाच वापर करतील. जडवाहनाचे ट्रक ओनर्स, ट्रक असाेसिएशन व चालकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूचीच लेन वापरावी. डिव्हायडरकडील बाजू माेकळी ठेवावी. शहराचे हद्दीतून 30 कि.मी. गतीची मर्यादा पाळावी.
..तर कारवाई अटळ
 
 
 
 
नागपूरमध्ये काम असलेल्या जड वाहनांच्या मालकांची दुपारी 12 ते 4 वाजता शहरात प्रवेश मिळावा, अशी मागणी आहे. तर शहरात दुसरीकडे शाॅर्टकट व टाेलपासून बचावाकरिता अन्य वाहने शहरात दाखल हाेतात. या बाबींचा विचारकरून प्रशासनाकडून शहरात विकासकामाचे पुरावे देणाèया वाहनाला यावेळेत परवानगी दिली जाईल. मात्र, दुपारी 12 ते 4 आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजतापर्यंत याव्यतिरीक्त काेणतेही जड वाहन आवगमन करीत दिसल्यास कारवाईअंती वाहन जप्त करण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0