जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना अर्थशास्त्रातील नोबेल

13 Oct 2025 15:47:58
नॉर्वे,
Nobel Prize in Economics announced अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी यंदा जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना सन्मानित करण्यात आले आहे. या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे आर्थिक वृद्धी, उद्योजकता आणि जागतिक बाजारपेठेतील बदल यावर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गेल्या वर्षी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार डॅरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना देण्यात आला होता. त्यांनी अभ्यास केला की काही देश श्रीमंत तर काही गरीब का आहेत, आणि अधिक मुक्त आणि खुल्या समाजांमध्ये समृद्धी वाढण्याची शक्यता जास्त असते.
 

Nobel Prize in Economics announced 
 
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अधिकृतपणे "अल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्थशास्त्रातील बँक ऑफ स्वीडन पुरस्कार" म्हणून ओळखला जातो. १९६८ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. स्वीडिश व्यापारी व रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो. Nobel Prize in Economics announced ते डायनामाइटचे शोधक असून त्यांनी पाच नोबेल पुरस्कारांची सुरुवात केली होती. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मूळ नोबेल पुरस्काराचा भाग नाही, तरी तो नेहमीच इतर नोबेल पुरस्कारांसह १० डिसेंबर रोजी, अल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिनानिमित्त देण्यात येतो. यंदा यापूर्वीच वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0