धक्कादायक प्रकार.. अधिकारी,कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत

13 Oct 2025 16:06:28
राजस्थान,
Banswara Rajasthan government office scandal बांसवाडा शहरातील दाहोद मार्गावर असलेल्या लोक स्वास्थ्य अभियांत्रिकी विभागाच्या (PHED) कार्यालयात रविवारी सरकारी कार्यालयात मद्यपानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विभागाचे अधीक्षक अभियंता (SE) जे.के. चारण यांनी अचानक टाकलेल्या छाप्यात लेखा विभागात कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.
 
 

Banswara Rajasthan government office scandal 
अधीक्षक अभियंता चारण यांना कार्यालयात काही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः कार्यालयात पोहोचून तपासणी केली. तपासणी दरम्यान लेखा शाखेत विभागाचा अकाउंटंट गौतम कुमार सोनी आणि आणखी तीन जण मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. कार्यालयातील ही अत्यंत संवेदनशील जागा असूनही, तिथे अशा प्रकारे मद्यपान केल्याचे उघड होताच एकच खळबळ उडाली.अधिकाऱ्यांची चाहूल लागताच उपस्थित कर्मचारी आणि इतर व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यामध्ये गौतम कुमार सोनी व त्याचे दोन साथीदार यशस्वीपणे पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, एका व्यक्तीस अधीक्षक अभियंत्यांनी तत्काळ पकडले आणि राजतालाब पोलिस ठाण्याला याची माहिती दिली.
घटनेची माहिती Banswara Rajasthan government office scandal  मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पकडलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले. घटनास्थळावरून बिअरच्या रिकाम्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शासकीय कार्यालयात मद्यपानासारख्या गैरप्रकारामुळे विभागाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.SE जे.के. चारण यांनी या प्रकाराला अत्यंत गंभीर मानत विभागाची प्रतिष्ठा मलीन करणारी घटना असल्याचे नमूद केले. यानंतर त्यांनी गौतम कुमार सोनी आणि इतर दोन अज्ञात फरार आरोपींच्या विरोधात राजतालाब पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीकडून चौकशी सुरू केली असून फरार असलेल्या मुख्य आरोपीसह इतर दोघांच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. हा प्रकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात उघड झाल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.सरकारी कार्यालयांतील शिस्त आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा आणि चिंताजनक मानला जात आहे. पुढील कारवाईसाठी पोलिस तपास सुरू असून दोषींवर लवकरच कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0