नागपूर,
rcm foundation day, सेवाभाव, आरोग्य जनजागृती आणि जीवनमूल्यांचा प्रसार करीत असलेल्याआरसीएमच्या वर्धापनदिन निमित्त रूपांतरण यात्रा काढण्यात आली. प्रामुख्याने मोठया संख्येने महिला, युवक सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील व्यक्तींना उद्योजक म्हणून संधी उपलब्ध करून हाच यामागील हेतू असल्याची माहिती आरसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ छाबड़ा यांनी दिली. प्रत्येक कुटुंबाला चांगले आरोग्य, आर्थिक संधी देत विकसित भारत घडविण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रियंका अग्रवाल यांनी सांगितले. रूपांतरण माध्यमातून नागपूरसह संपूर्ण राज्यात आगामी काळात विकासाच्या नव्या संधी निर्माण होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी रक्तदान शिबिरासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात अनेकांनी उत्साहाने सहभाग घेऊन रक्तदान केले.