संजय राऊतांची प्रकृती खालावली

13 Oct 2025 12:40:17
मुंबई,
sanjay-rauts-health-deteriorates शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील भांडुप इथल्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती. अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने फोर्टिज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
 
 
Sanjay Raut
 
संजय राऊत यांना आज अचानक रुग्णालयात का दाखल केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. sanjay-rauts-health-deteriorates त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका केली होती.
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाच्या विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत सतत करतात. त्यासाठी रोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेणाèया राऊतांवर ‘9 चा भोंगा’ अशी टीकाही केली जाते.
Powered By Sangraha 9.0