छत्रपतींच्या पुतळ्यासमोर जाहिरातींचे फलक

13 Oct 2025 19:09:42
तभा वृत्तसेवा उमरखेड,
umarkhed shivaji statue येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विविध प्रकारच्या जाहिरातींचे फलक (बॅनर्स) लावल्या जात असून त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्यासमोर होत असलेले विद्रुपीकरण तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी संयुक्त पत्रकार संघाच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाèयांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.संयुक्त पत्रकार संघाच्या या निवेदनामध्ये म्हटले आहे की, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्या भोवती टिनशेड आहे. त्यावर प्रतिष्ठित व्यक्तींचे वाढदिवस, प्रतिष्ठानचे उद्घाटन किंवा तत्सम विविध जाहिरातींचे बॅनर लावले जात असल्याने अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विद्रूप चित्र बघावयास मिळत आहे.
 

umarkhed shivaji statue 
अगोदरच छत्रपतींच्या पुतळा सौंदर्यीकरण कामात विविध प्रकारचे अडथळे निर्माण होत असून त्यात या पुतळ्यासमोर जाहिरातींचे फलक लावून सुशोभीकरणाचे आधीच विद्रुपीकरण होत असताना दिसत आहे. ही खेदाची तसेच अशोभनीय बाब असून नप मुख्याधिकाèयांनी या प्रकाराची दखल घेऊन या जागी असे फलक लावण्याची परवानगी देणे टाळावे.त्याचप्रमाणे भविष्यात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवताली फलक लागून विद्रुपीकरण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, या आशयाचे निवेदन दिले आहे. याप्रसंगी निवेदन देताना संयुक्त पत्रकार संघाचे समस्त पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0