मेरठ,
Skull pulled from a burning pyre जिल्ह्यातील मुंडली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अजराडा गावात एका भयंकर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली. स्मशानभूमीत काही तरुण जळत्या चितेतून मानवी कवटी बाहेर काढून तांत्रिक विधी करत असल्याचे उघड झाल्याने सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी ही घटना पाहताच तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन आरोपींना पकडलं, तर त्यांचा एक साथीदार पसार झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बलजीत आणि इम्रान अशी असून, फरार आरोपीचे नाव शौकीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्मशानभूमीत चाललेल्या या विधीत आरोपींनी जळलेल्या चितेतून कवटी काढून त्याजवळ तांदूळ, लिंबू, अगरबत्ती आणि दारूची बाटली ठेवली होती.

या चितेवर काही तासांपूर्वीच गावातील दलित युवक गजेंद्र याचे अंत्यसंस्कार झाले होते. गजेंद्रची हत्या दिल्लीत झाल्यानंतर त्याचा मृतदेह शुक्रवारी गावात आणण्यात आला होता. Skull pulled from a burning pyre घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना अटक करून तांत्रिक विधीमध्ये वापरलेले साहित्य जप्त केले. स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर राम गोपाल सिंह यांनी सांगितले की, अटक केलेले दोघे आरोपी आता तुरुंगात आहेत, तर फरार आरोपी शौकीनचा शोध सुरू आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक अभिजीत कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत आरोपींनी तांत्रिक विधी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०१, २९९ आणि १९६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस फरार आरोपीला अटक करण्यासाठी शोधमोहिम राबवत असून, या विचित्र आणि भयावह प्रकाराने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.