सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!

13 Oct 2025 16:35:32
बीड,
Suicide due to torture बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाने मानसिक त्रास आणि कुटुंबाच्या छळामुळे गळफास घेत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भागवत अंकुश राठोड नावाच्या तरुणाने १ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात त्याला होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला होता.
 
 
 
Suicide due to torture
सुसाईड नोट आणि घटनेच्या तपासानंतर, भागवतच्या आई सुनिता राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, भागवतला त्याची पत्नी राणी राठोड, Suicide due to torture सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड हे मानसिक त्रास देत होते. पोलीस यांनी या तिन्ही जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. सदर घटनेने कुटुंबातील हुंडाबळी, मानसिक त्रास आणि विवाहानंतरच्या छळाच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. पोलीस अधिक तपास करत असून, भागवतने अशा टोकाच्या निर्णयापर्यंत का गेला, याची सविस्तर चौकशी सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0