रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

13 Oct 2025 15:36:45
सिंदेवाही, 
tiger-dies-in-train-collision गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर आलेवाही-सिंदेवाही दरम्यान मालगाडीची धडक बसल्याने 14 वर्षीय नर वाघ ‘बिट्टू’चा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
 

tiger-dies-in-train-collision 
 
मृत वाघाचे कारगटा बीट परिसरात वास्तव होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना मालगाडीची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. tiger-dies-in-train-collision घटनेची माहिती कळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास वनविभाग करीत आहे.
Powered By Sangraha 9.0