वाशीम,
Development Path- Pasha Patel संपूर्ण जगभरात हवामान बदलाचे भीषण परिणाम दिसून येत आहेत. भारतासह अनेक देशात अचानक बगफुटी होऊन गावच्या गावं पुरात वाहून जातात. तर दुसरीकडे जंगलात आग व तापमानात प्रचंड वाढ दिसून येत आहे. वातावरणात कार्बन ऑसाईडचे प्रमाण धोयाच्या पातळीवर पोहोचले आहे. याला थांबवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे हिरवळ वाढविणे, कार्बन शोषून घेणारी पिके घेणे, यामध्ये सर्वात सोपा आणि खात्रीशीर पर्याय म्हणजे बाबू शेती आहे. हवामान बदलामध्ये बाबू शेती हा मानव जातीच्या शाश्वत विकासाचा मार्ग ठरेल असा आशावाद राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

वाशीम येथील हॅप्पी फेसेस स्कूलच्या स्व. यमुनादेवी शंकरलाल हेडा राभागृहामध्ये आयोजित बाबू परिषद मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बांबू परिषदेचे आयोजन भाजपा नेते राजू पाटील राजे याच्यावतीने करण्यात आले. या परिषदेकरीता माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या परिषदेला खा. संजय देशमुख, आ. श्याम खोडे, आ. तानाजी मुटकुळे, माजी आ. विजय जाधव, पुरुषोत्तम राजगुरु, माजी जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, तेजराव वानखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा, बीडीओ रविंद्र सोनुने गोपाल पाटील राऊत आदिची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या ढासाळलेल्या किमती, निसर्गाचा असमतोल, कमी कालावधीत होणारा सर्वाधिक पाऊस आदि घटकांमुळे शेली क्षेत्रावर आलेल्या संकटाबाबत माहिती दिली. जगात बांबूच्या १६४२ जाती असून, बाबूपासून नानाविध २ हजार वस्तूचे उत्पादन होते ज्यामध्ये कपड़े, पेन, ब्रश, पायमोजे, टॉवेल, पड्याळ, नोटबुक, कागद आदि कितीतरी वस्तुंचे उत्पादन होत असते. शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर बाबू लागवड केली तर त्याचा वापर बायोमास मध्ये होईल. दगडी कोळशाचे प्रमाण घटेल, तात्पर्याने अवदाता असणारा आमचा शेतकरी बांधव हा ऊर्जा दाता होईल, असेही पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले.
बांबूपासून इथेनॉल, मिथेनॉल ची निर्मिती होती. शिवाय ५ लाख रुपये किलो असणारे ग्राफीन देखील तयार होते. ग्राफीनचा वापर प्रामुख्याने इलेट्रॉनिक वस्तूंच्या वापरासाठी होतो. लोखड निर्मिती प्रक्रियेत देखील ग्रीन स्टीलचा वापर वाढून, दगडी कोळशाची जागा बांबू घेईल, असे मार्गदर्शन पाशा पटेल यांनी यावेळी केले. या परिषदेला वाशीम, हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.