वर्धा,
avathlon championship पोलिस अंमलदार विक्रम काळमेघ यांची कन्या ईश्वरी काळमेघ (१३) हिने अवाथलॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलींमधून भारतात प्रथम क्रमांक पटकाविला.
मध्य प्रदेशातील भोपाल येथे ट्रायथलॉन असोसिएशनद्वारा आयोजित राष्ट्रीय अवाथलॉन चॅम्पियनशिप १५ वर्षाआतील मुली इव्हेंट ३५० मीटर स्विमिंग ३ किमी, रनिंग नॅशनल सब ज्युनियर, ज्युनियर अवाथलॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत १७ मिनिट ५६ सेकंद, ७ मायक्रो सेकंदात पूर्ण करून ईश्वरी काळमेघ हिने प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. सदर स्पर्धा या ऑर्गनाईज इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन मध्य प्रदेश ट्रायथलॉन असोसिएशनच्या वतीने भोपाळ, मध्य प्रदेश येथे पार पडल्या. ईश्वरी ही सावंगी येथील स्कूल ऑफ स्कॉलर येथे इयत्ता सातव्या वर्गात शिकत आहे.avathlon championship तिने आपल्या यशाचे श्रेय रंजना वानखेडे, आईवडिल, प्राचार्य सुरेश लकडे, क्रीडा शिक्षक साजिद शेख यांना दिले आहे. ईश्वरीने केलेल्या कामगिरीचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.