हिंगणघाट,
illegal slum encroachments शहरातील कलोडे सभागृह परिसरातील अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण स्थलांतरित करण्यासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला खा. अमर काळे यांनी भेट देवून उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. जिल्हाधिकार्यांनी याविषयी तात्काळ बैठक घेण्याची मागणी केली. अन्नत्याग आंदोलनाचा आज दिवस दुसरा असून उपोषणकर्त्यांचे प्रकृतीला धोका झाल्यास शासन, प्रशासन राहील असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला.
शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील कलोडे चौक येथील अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात २०१२ पासून प्रशासनाला संत तुकडोजी वार्डातील नागरिक मागणी करीत आहे. सर्वे क्र. १७६/२ (कलोडे सभागृह समोर) संत तुकडोजी वार्ड मौजा पिंपळगाव या जागेवरील अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात कोर्टाचा आदेश जून २०१७ व जुलै २०२२ रोजीचा असून सुद्धा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकार्यांना २९ जून रोजी निवेदन दिले. नंतर जिल्हाधिकार्यांना १४ जुलै रोजी निवेदन दिले. यासंदर्भात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले. या आंदोलन दरम्यान प्रशासनाने २० दिवसाच्या आत कारवाई करून अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु आतापावतो प्रशासनाने काहीही केलेले नाहीत. शहरातील कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टी अतिक्रमण धारकांच्या दुसरीकडे पुनर्वसनाच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. झोपडपट्टी हटाव संघर्ष समिती व संत तुकडोजी वार्ड रहिवासी यांच्या वतीने हे आंदोलन गेल्या सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू आहे.illegal slum encroachments तथापी प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने आणि मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर संघर्ष समितीने सहाव्या दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते तसेच नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार उपोषणकर्त्यानी केलेला आहे.
यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शेतकरी नेते अनिल जवादे, प्रवीण उपासे, मोहम्मद रफीक, सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, आदी उपस्थित होते.