10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 2 आठवडे आधीच; जाणून घ्या तारखा

14 Oct 2025 14:05:05
पुणे:
Maharashtra Board Exam 2026 राज्यात एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची चांगलीच तयारी सुरू असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (पुणे) आगामी फेब्रुवारी–मार्च 2026 मधील 10 वी (एसएससी) आणि 12 वी (एचएससी) बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यंदा मंडळाने या परीक्षा पारंपरिक वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन सुलभ करणे आणि त्यांच्या ताणावर मर्यादा आणणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले आहे. मंडळाला विश्वास आहे की याचा विद्यार्थी वर्गाला निश्चित फायदा होईल.
 
Maharashtra Board Exam 2026
 
10 वी, 12 वीच्या लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक
मंडळाने परीक्षांचे परिपत्रक जाहीर केले असून, त्यानुसार:
12 वी (एचएससी) परीक्षा:
लेखी परीक्षा: मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 मार्च 2026
(माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह)
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा: शुक्रवार, 23 जानेवारी 2026 ते सोमवार, 9 फेब्रुवारी 2026
10 वी (SSC) परीक्षा:
लेखी परीक्षा: शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 मार्च 2026
प्रात्यक्षिक परीक्षा: सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 फेब्रुवारी 2026
(शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह)
ही परीक्षा वेळापत्रके पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यातील सर्व 9 विभागीय मंडळांसाठी लागू असतील. सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल, जेव्हा विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी कोणत्या विषयाची परीक्षा होणार आहे हे कळेल. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. Maharashtra Board Exam 2026 शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन केले आहे की, फक्त अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणाऱ्या अंतिम वेळापत्रकावर विश्वास ठेवावा, समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या वेळापत्रकांवर अवलंबून राहू नये.
Powered By Sangraha 9.0