अनिल कांबळे
नागपूर,
fraud-case : अपघात झाल्याचा बहाणा करुन रुग्णालयाचे बील आणि पुढील उपचारासाठी पैशांची गरज असल्याची भाविक साद घालून फेसबूकवरुन झालेल्या मित्राने एका महिलेला 7 लाखांनी फसवणूक करण्यात आली. बजाजनगर पाेलिसांनी तक्रारीवरुन तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. डाॅ. कल्पेश वंजारी (40, रा, भाेपाळ-मध्यप्रदेश), त्याची आई आणि सेजल पांडे (35) अशी आराेपींची नावे आहेत.
पीडित 62 वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या पेन्शनवर ती उदरनिर्वाह करते. महिलेची फेसबुकवर डाॅ. वंजारी याच्याशी भेट झाली. महिलेची डाॅ.वंजारीच्या आईशीदेखील ओळख झाली. तिघांनीही चॅटिंग सुरू केले. 3 एप्रिल राेजी वंजारीच्या आईने तिला व्हाॅट्सअप आणि व्हिडिओ काॅल केला. तिने मुलीचा अपघात झाल्याची बतावणी केली. त्यानंतर व्हिडीओ काॅलवरून त्यांनी दवाखान्यात मुलगी दाखल असल्याचेदेखील सांगितले. दाेन दिवसांनी मुलीचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मुलीच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
महिलेने विश्वास ठेवून सात लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर आराेपी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. त्यांनी महिलेला ब्लाॅक केले. काही दिवसांनी महिलेने डाॅ.वंजारीला फोन केला असता समाेरील व्यक्तीने कल्पेशने आत्महत्या केली असल्याचे सांगत यानंतर ाेन करू नका असे सुनावले. तसेच सर्व ाेन काॅल्स व चॅट डिलीट करा, नाही तर आत्महत्येच्या प्रकरणात तुम्हीच अडकाल असे सांगितले. महिलेने घाबरून तसेच केले. मात्र डाॅ.कल्पेश जिवंत असून त्याने नवीन खाते तयार केल्याची बाब निदर्शनास आली. महिलेच्या तक्रारीवरून तीनही आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.