वर्धा जिल्ह्यातील पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

14 Oct 2025 12:25:12
वर्धा,
reservation for panchayat samiti पंचायत समितीमध्ये सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य असून त्यापैकी १४ जणांची सोमवारी सोडत झाली. याशिवाय १४ जिल्हा परिषद सर्कलमध्ये राहणार्‍या २८ पंचायत समिती सदस्यांची आरक्षणे पंचायत समितीच्या सभागृहात सोडण्यात आली. यात मांडवा सर्कलमध्ये एसटी प्रवर्गासाठी आंजी मोठी सर्वसाधारण सर्वसाधारण, पिपरी मेघे ओबीसी महिला, पिपरी मेघे ओबीसी महिला, सिंदी मेघे एससी महिला, सिंदी मेघे ओबीसी महिला, पवनार सर्कल ओबीसी महिला, साटोडा सर्वसाधारण, नालवाडी ओबीसी, मसाळा एससी महिला, वरुड सर्वसाधारण महिला, वायगाव सर्वसाधारण महिला, गोविंदपूर सर्कल महिला सेवाग्राम अनुसूचित जाती. महिला, बरबडी सर्वसाधारण महिला, ५५ बोरगाव मेघे सर्वसाधारण महिला आणि ५६ बोरगाव मेघे सर्वसाधारण महिला, सावंगी मेघे अनुसूचित जाती आणि पालोती अनुसूचित जाती, उमरी मेघे अनुसूचित जमाती महिला, सालोड हिरापूर सर्वसाधारण महिला, वायफड, दहेगाव मिस्कीन, वायगाव निपाणी सर्कल सर्वसाधारण महिला, पडेगाव सर्कल सर्वसाधारण महिला, तळेगाव तलाटुले सर्वसाधारण महिला, सेलूकाटे सर्कल ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.
 

wardha 
 
 
सेलू पंसचे १२ सदस्य
सेलू तहसीलमध्ये ६ जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समिती सदस्य आहेत. या सदस्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. सालाई कला एसटी महिला, झडसी ओबीसी, हिंगणी आणि घोराड हे सर्वसाधारण (महिला)साठी राखीव आहेत. केळझर एसटी, दहेगाव एससी, येळाकेळी सर्वसाधारण, आकोली ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी, महाबाळा आणि सुकळी स्टेशन सर्वसाधारण, हमदापूर सर्वसाधारण महिला आणि देऊळगाव ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.
कारंजामध्ये ८ पंस सदस्य
कारंजा (घा.) : कारंजा पंचायत समितीच्या ८ सदस्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. ठाणेगाव आणि सारवाडी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. कन्नमवार ग्राव, सेलगाव उमाटे हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी, पारडी ओबीसी, नारा सर्कल ओबीसी महिलांसाठी, कुंडी एससी प्रवर्गासाठी आणि सिंदिविहिरी पंचायत समिती सर्कल एसटी महिलांसाठी राखीव आहेत.
देवळी पंसमध्ये १२ सदस्य
देवळी : गुंजखेडा पंस सर्कल अनुसूचित जाती महिला, आगरगाव ओबीसी, नांदोरा-बोरगाव (अ.) आणि भिडी हे सर्वसाधारण प्रवर्ग, गौळ-सोनोरा ढोक सर्वसाधारण प्रवर्ग महिला, नाचनगाव आणि अंदोरी ओबीसी प्रवर्ग महिला, नाचनगाव (अ.) एससी प्रवर्गा, इंझाळा सर्कल एसटी प्रवर्ग, विजयगोपाल सर्कल एसटी प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहेत.
आष्टी ६ सदस्य
आष्टी शहीद : साहूर, भारसवाडा आणि तळेगाव पंचायत समिती सर्कल हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. माणिकवाडा सर्कल एसटीसाठी, आर्वी (छोटी) सर्कल ओबीसीसाठी आणि अंतोरा सर्कल अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.
हिंगणघाट पंसत १४ सदस्य
हिंगणघाट : पंचायत समितीमधून १४ सदस्य आहेत. सर्वसाधारण सदस्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले यात ३ महिलांचा समावेश आहे. ३ ओबीसी सदस्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातून प्रत्येकी २ सदस्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.reservation for panchayat samiti पंचायत समितीचे वाघोली सर्कल एससी महिला, वणी सर्कल एसटी महिला, सावली (वाघ) सर्कल सामान्य महिला, नांदगाव (बो.) सर्कल ओबीसी, शेकापूर (बाई) सर्कल सामान्य, बुरकोनी एसटी, अल्लीपूर ओबीसी महिला, आर्वी (लहान) सर्कल सामान्य, कानगाव एससी, खानगाव सामान्य महिला, वडनेर सामान्य, फुकाटा सामान्य महिला, पोहाणा सर्कल ओबीसी महिला आणि पिंपरी सर्कल सामान्यसाठी राखीव आहे.
आर्वीत १२ सदस्य
आर्वी : सहा जिल्हा परिषद गटातील १२ पंचायत समिती गणा करता करण्यात आलेल्या सोडतीनुसार रोहणा अनु. जमाती (महिला), धनोडी- सर्वसाधारण, विरूळ- नामाप्र (महिला), रसुलाबाद अनु. जमाती, वाठोडा अनु. जाती, देऊरवाडा अनु. जाती (महिला), वाढोणा नामाप्र, बोथली नामाप्र (महिला), जळगाव सर्वसाधारण (महिला). वर्धमनेरी-सर्वसाधारण, खरांगणा-सर्वसाधारण महिला, मोरांगणा-सर्वसाधारण काढण्यात आली.
समुद्रपुरात १२ सदस्य
समुद्रपूर : पंसच्या १२ जागांमध्ये कांढळी सर्कल नामाप्र महिला, वायगाव गोंड सर्वसाधारण महिला, गिरड सर्वसाधारण, मोहगाव अनुसूचित जाती, मांडगाव सर्वसाधारण, सुजातपूर सर्वसाधारण, जाम सर्वसाधारण महिला, वायगाव हळद्या नामाप्र, नंदोरी नामाप्र महिला, सावंगी (झाडे) सर्वसाधारण महिला, कोरा अनुसूचित जमाती, मंगरूळ अनुसूचित जमाती महिला. विशेष म्हणजे पंचायत समिती सभापती आरक्षण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून हि जागा कुठे आरक्षत नसल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. पंस सभापती आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षत असेल तर मग करायच काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. फत मोहगाव पंस सर्कलला अनुसूचित जातीसाठी आरक्षत आल्याने सर्वांचे लक्ष मोहगाव पंस सर्कलकडे लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0