सोलर कंपनीविरोधात रास्ता रोको आंदोलन

14 Oct 2025 12:23:03
समुद्रपूर, 
Roadblock movement| : जाम आणि मेनखात या गावांमध्ये सुरू असलेल्या रवींद्र एनर्जी सोलर कंपनीच्या कामामुळे गावातील मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कंपनीच्या ओव्हरलोडेड वाहनांमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, दोन्ही गावातील नागरिकांनी कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करीत कंपनीच्या अधिकार्‍यांकडे तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.
 
 
wardha
 
 
 
रवींद्र एनर्जी सोलर कंपनीचे काम सुरू असून कंपनीची मोठमोठी जड वाहतूक सुरू आहे. या जड वाहतुकीमुळे गावातील मुख्य रस्ते पूर्णत: उखडले. या खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन त्यांना दुखापती झाल्या आहे. वाहन चालक आणि विद्यार्थी यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या पृष्ठभूमीवर मेणखात व जाम येथील गावकर्‍यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी कंपनीविरोधात घोषणाबाजी करत रवींद्र एनर्जी सोलर कंपनीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. दोन दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही गावकर्‍यांनी दिला.
 
 
दरम्यान, सोलर कंपनीच्या अधिकार्‍यांनी गावकर्‍यांच्या तक्रारींची दखल घेत रस्त्यांची तपासणी करून दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जाम व मेनखात येथील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
Powered By Sangraha 9.0