तळेगाव (श्या.पंत),
atul moghe राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी शताब्धी साजरी करीत आहे. या काळात संघाने बरेच चढ उतार बघितले. समाजात जनजागृती करण्याचे काम संघाच्या माध्यमातून केले जाते. समाजाने संघासोबत उभे रहावे, असे आवाहन प्रमुख वते विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी केले.
स्थानिक लोकमान्य विद्यालयाच्या प्रांगणावर आष्टी नगरच्या विजया दशमी उत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी बंडू हिरुडकर, विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे, अमरावती जिल्हा सहकार्यवाह विनोद लोहकरे, तालुका कार्यवाह रितेश गंध्रे उपस्थित होते.मोघे यांनी संघ स्थापनेची पृष्ठभूमी, पंच परिवर्तना विषयी आपले विचार व्यत करताना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला सांभाळण्यासाठी, प्रगती पथावर नेण्यासाठी सक्षम, सुसंस्कारित व इतिहासाची जाण असणारा समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी केल्याचे मोघे म्हणाले. बंडू हिरुडकर म्हणाल की, पथसंचलन व मैदानावर स्वयंसेवकांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकाच्याव्दारे मला संघदर्शन आज झाले. लहान मुलांनी मोबाईलपासून दूर राहून चांगल्या संस्कारांसाठी संघाच्या शाखेत यावे असे आवाहन करून त्यांनी संघ शताब्दी निमित्त शुभेच्छा दिल्या.atul moghe प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय, स्वागत व आभार तालुका कार्यवाह रितेश गंध्रे यांनी केले. सांघिक गीतानंतर शारीरिक प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले. वैयक्तिक गीत, सुभाषित व अमृतवचन सादर केले. उत्सवापूर्वी गावातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले.