रा. स्व. संघात स्वयंसेवक अविभाज्य घटक : रणदीप बीसणे

14 Oct 2025 18:15:26
तरोडा, 
Vijayadashami celebrations in Taroda राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळात स्वयंसेवकांनी आपले अतुलनीय योगदान दिलेले आहे. हिंदू समाज विकसित कसा होईल यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी विशेष लक्ष दिले आहे. तरोडा या गावाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संस्मरणीय स्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक हे अविभाज्य घटक आहे. भविष्याचा वेध घेता आला पाहिजे. सुवर्णकाळ साध्य करायचा असेल तर हिंदू समाज संघटित होणे ही काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन विद्या भारतीचे प्रांत सहमंत्री रणदीप बिसने यांनी केले. ते तरोडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वता म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून रामकृष्ण जोगे होते तर उपखंड कार्यवाह आशिष लांडगे व्यासपिठावर उपस्थित होते.
 
 
 

Vijayadashami celebrations in Taroda 
 
बिसने पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्सवामध्ये सहा उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विजयादशमी उत्सवात प्रेरणा, स्वाभिमान, संवर्धन ही मूल्य रुजविली जाते. या सणाचे मूल्य जपले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी गावातील मुख्य मार्गावरून घोष पथकासह पंथसंचलन काढण्यात आले. या उत्सवाला तरोडा मंडळातील स्वयंसेवक नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक व सुभाषित मिलिंद वैद्य यांनी केले. अमृतवचन विनोद अवचट तर वैयक्तिक गीत राजू उघडे यांनी सादर केले.
Powered By Sangraha 9.0