जि.प.च्या २६ जागांवर महिलाराज; इच्छुकांचा हिरमोड

14 Oct 2025 12:32:39
वर्धा,
womens rights नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणानंतर आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज सोमवार १३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वान्मथी सी. आणि उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत) श्रीपती मोरे यांच्या उपस्थितीत जिप सदस्यपदाची आरक्षण सोडत पार पडली. जिप गट व पंस गणाचे आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांना मोठा धक्का बसला. त्यामुळे काही जागांवर नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार आहे.
 
 

mahila sadasya 
 
 
वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित असल्यामुळे सर्वांचे लक्ष गटाच्या आरक्षणाकडे लागले होते. जिल्हा परिषदेमध्ये ५२ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यापैकी २६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या या प्रक्रियेमुळे अनेक दावेदारांचे समीकरण बदलले. काहींचे स्वप्ने भंगली तर काहींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी इच्छूक पुरुषाला संधी मिळाली नाही त्या ठिकाणी आता पत्नीला उभे करण्याचा प्रयत्न होईल. अनुसूचित जमातींसाठी ७ जागा आहेत. त्यात ४ जागा महिलांसाठी तसेच मागासवर्गसाठी १४ जागा पैकी त्यातील ७ महिलांसाठी राखीव आहेत.
सर्वसामान्य प्रवर्गासाठी २४ जागा आहेत. त्यातील ११ महिलांसाठी आहेत. २४ जागा सर्वसामान्य वर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात पोहणा, सालोड (हिरापूर), मांडगाव, तरोडा, पिपरी (मेघे), तळेगाव (टालाटूले), महाबळा, जळगाव, लहान आर्वी, केळझर, गिरड, वडनेर, ठाणेगाव तर सर्वसामान्य महिलांसाठी पारडी, अल्लीपूर, तळेगाव (श्या. पंत.), वाठोडा, शेकापूर (बाई), कानगाव, जाम, अंदोरी, कन्नमवारग्राम, वाघोली, सावली (वाघ) या गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी १४ जागा आहेत. त्यात येळाकेळी, आंजी (मोठी), कांढळी, सेवाग्राम, हमदापूर, वायगाव (नि.), वायफड तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी भिडी, घोराड, पवनार, वरुड, बोरगाव (मेघे), नंदोरी, इंझाळा या गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.womens rights अनुसूचित जातीसाठी ७ जागा आहेत. त्या गौळ, गुंजखेडा, नाळवाडी तर अनुसूचित जाती महिला असे वाठोडा, नाचणगाव, सिंदी (मेघे), सावंगी (मेघे) या गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
अनुसूचित जमातीसाठी कोरा, झडशी, विरुळ तर अनुसूचित जमाती महिलांकरिता मोरांगणा, साहूर, रोहणा, सिंदी (विहिरी) या गटाचे आरक्षण सोडती अंती जाहीर करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0