‘एक दिवाळी : शेतकरी कुटुंबांसाठी’

15 Oct 2025 19:13:47
जीवनावश्यक किटचे वाटप आज

यवतमाळ,
यवतमाळ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा दुर्दैवाने ओळख झाली. अनेक कुटुंबांना याचा परिणाम सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सेवाभावी सामाजिक संस्था आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'Eka divali: setakari kuṭumbasaṭhi' ‘एक दिवाळी : शेतकरी कुटुंबासाठी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 

setakari 
 
येथील केमिस्ट भवन, शिवाजीनगर, यवतमाळ येथे गुरुवार, १६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता होणार्‍या कार्यक‘मात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबांपर्यंत आनंदाचा किरण पोहोचवणे हा या उपक‘माचा उद्देश आहे.
 
 
'Eka divali: setakari kuṭumbasaṭhi' सर्व नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग आणि मंडळींनी या सामाजिक उपक‘मात सहभागी होऊन मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ हा संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न या उपक‘मातून होणार आहे.
Powered By Sangraha 9.0