तीन यवतमाळकर ‘हाफ आयर्नमॅन’

15 Oct 2025 20:53:29
यवतमाळ, 
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबद्वारे कोल्हापूर येथे झालेल्या ट्रायथलॉन 'Half Ironman' (हाफ आयर्नमॅन) रिले स्पर्धा यवतमाळचे अ‍ॅड. नारायण तांबुळे आणि त्यांचे सहकारी डॉ. हर्षल व नीतारेड्डी कुंटावार त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या स्पर्धेत १.९० किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१ किमी धावणे समाविष्ट असते.
 
 
 Half Ironman
 
यात अ‍ॅड. नारायण तांबुळे यांनी राजाराम तलाव, कोल्हापूर येथे १.९० किमी पोहणे, डॉ. हर्षल झोपाटे यांनी ९० किमी सायकलिंग, तर नीतारेड्डी कुंटावार यांनी २१ किमी रनिंग ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या तिघांनाही 'Half Ironman' ‘हाफ आयर्नमॅन’ या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0