श्री नरकेसरी प्रकाशनचे ‘वेदामृतधारा’

15 Oct 2025 19:31:51
विवेकानंद विद्यालयात भेट : वाचन प्रेरणा दिनी उपक्रम

यवतमाळ, 
भारताचे ११ वे भारतरत्न, मिसाईलमॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, १५ ऑक्टोबर दरवर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम केले जातात. यावर्षी नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनच्या वतीने ‘तरुण भारत’ दैनिकात प्रकाशित व डॉ. शैलजा रानडे यांच्या स्तंभातील संपादित संग्रह 'Vedamritdhara' ‘वेदामृतधारा’ विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे पर्यवेक्षक विवेक अलोणी यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा तरुण भारतचे स्तंभलेखक विवेक कवठेकर यांनी सप्रेम भेट दिले.
 
 
vedamritdhara
 
डॉ शैलजा रानडे या विवेकानंद विद्यालयामध्ये संस्कृत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. पुढे त्यांनी बाबाजी दाते महाविद्यालयात संस्कृत विभागप्रमुख म्हणून काम केले. डॉ. रानडे यांनी नागपूरच्या तरुण भारतमधून क्रमशः लिहिलेल्या 'Vedamritdhara' ‘वेदामृतधारा’ या लेखमालेचा संग्रह श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. वाचन प्रेरणा दिनी ही आम्हाला अत्यंत मोलाची भेट ठरली आहे, असे उद्गार याप्रसंगी मीनाक्षी काळे व विवेक अलोणी यांनी काढून तरुण भारत परिवारास धन्यवाद दिले.
Powered By Sangraha 9.0