खून प्रकरणातील आरोपी जन्मठेपेची शिक्षा

15 Oct 2025 18:27:05
मंगरुळनाथ, 
Accused sentenced to life imprisonment चिखलागड येथील सुरेश जाधव यांच्या खून प्रकरणातील आरोपी मंगल लक्ष्मण राठोड यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश यांनी आजन्म कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर घटना ही १५ मार्च २०२२ रोजी चिखलागड येथे घडली होती. याबाबत सविस्तर असे की, मंगरुळनाथ तालुयातील आसेगाव पोस्टे अंतर्गत येत असलेल्या चिखलागड येथे मृतक सुरेश जाधव यांची भावसून घराबाहेर भांडे घासत असतांना आरोपी मंगल राठोड हा छेड काढत असतांना सुरेश जाधव हा समजावून सांगत असतांना मंगल राठोड याने जवळचा चाकू काढत सुुरेश जाधव यांच्या छातीत वार केला.
 
 

Accused sentenced to life imprisonment 
 
या दरम्यान सुरेश जाधव यांचा मुलगा अनिल जाधव हा मध्यस्थी करण्यासाठी गेला असता त्याचेवरही उपरोक्त आरोपीने जीवघेणा हल्ला केला. अशा स्वरुपाची तक्रार मृतकाचा मुलगा अनिल जाधव याने मंगरुळनाथ पोलिस स्टेशनला दिली. त्यावरून आरोपी विरुद्ध ची कलम ३०२, ३०७, ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास अधिकारी संदीप नरसाळे यांनी करुन प्रकरण न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी विद्यमान न्यायालयाने एकूण १३ साक्षीद ार तपासले व पुराव्याच्या आधारावर १५ ऑटोबर २०२५ रोजी मंगरुळनाथ येथील सत्र न्यायधीश व्हि. व्हि. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने कलम ३०२ च्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा तसेच कलम ३५४ नुसार दोन वर्षाचा सश्रम कारावास दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारवासाची शिक्षा सुनावली. सदर गुन्ह्याचा तपास एपीआय संदीप नरसाळे तसेच कोर्ट पैरवी म्हणून मपोकॉ प्रवीण भुरीवाले यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात सरकारी वकील एस. के. उंडाळ यांनी बाजू मांडली.
Powered By Sangraha 9.0