ऑस्ट्रेलियाने मालिकेपूर्वी भारतीय संघाचा केला अपमान VIDEO

15 Oct 2025 14:00:45
सिडनी,
Australia insulted the Indian team टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने वादग्रस्त हस्तांदोलन प्रकरणाची खिल्ली उडवली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून एकदिवसीय आणि टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, मात्र मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाचे एक व्हिडिओ व्हायरल झाले आहे, ज्यात त्यांनी आशिया कप २०२५ दरम्यान पाकिस्तानी संघाविरुद्ध भारताने केलेल्या हस्तांदोलन न करण्याच्या निर्णय दाखवीला आहे.
 
 
Australia insulted the Indian team
 
आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये पारंपारिक हस्तांदोलन टाळले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आता ऑस्ट्रेलियन संघाने त्या वादाची खिल्ली उडवताना स्वतःचे अभिनव अभिवादन दाखवले, ज्या मध्ये खेळाडूंनी पारंपरिक हातमिळवणीचा अवलंब न करता वेगळ्या पद्धतीने एकमेकांचे स्वागत केले.
 
 
 
व्हिडिओमध्ये अँकरने ऑस्ट्रेलियन संघाला भारताच्या पारंपारिक अभिवादनाची कमकुवत बाजू लक्षात आणून दिली. त्यानंतर जोश हेझलवूड, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्कसह इतर खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारे अभिवादन करून मालिकेपूर्वीची उत्सुकता आणि हळूहळू हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाच्या ताणलेल्या संबंधांमुळे टाळलेल्या हस्तांदोलनाशी निगडित आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या खिल्लीमुळे मालिकेपूर्वीचा हा प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
Powered By Sangraha 9.0