गांजाची शेती, १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

15 Oct 2025 19:24:48
अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत शेतकर्‍यावर कारवाई

महागाव, 
अवैध धंदे, शस्त्रसाठा आणि अंमली पदार्थ तस्करी यांचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी कडक आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव तालुक्यात मोठी कारवाई केली असून मंगळवार, १४ ऑक्टोबर महागाव तालुक्यातील नगरवाडी परिसरात Cannabis plants seized गांजाची अवैध शेती उघडकीस आणली आहे. नगरवाडी येथील गजानन नारायण मेटकर (वय ५०) यांच्या शेत सर्वे क‘. १२/१ मध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ व पुसद पथकाला मिळाली. ही माहिती वरिष्ठांना अवगत करून पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाड टाकली.
 
 
Ganja
 
तपासादरम्यान ३१ लहान-मोठी अशी एकूण ३७ किलो ५०० ग्रॅम वजनाची Cannabis plants seized गांजाची झाडे आढळून आली. पंचासमक्ष पंचनामा करून ती झाडे जप्त करण्यात आली. या झाडांची किंमत अंदाजे १,८७,५०० इतकी आहे. या प्रकरणी आरोपी गजानन मेटकर याच्याविरुद्ध महागाव पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा कलम ८ २० (बी) (१) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, स्थागुशा पोलिस निरीक्षक सतीश चवर आणि ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात सहपोलिस निरीक्षक धीरज बांडे, उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार मुन्ना आडे, यांच्यासह संतोष तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे आणि राजेश जाधव यांचा सहभाग होता.
Powered By Sangraha 9.0