नागपूर,
Dharampeth College Nagpur महाराष्ट्र कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक विदर्भ स्तरावरील एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने उत्कृष्ट यश संपादन केले.
महाविद्यालयातील चैतन्य डुबे याने वाचिक अभिनय आणि अभिनय नैपुण्य अशी दोन पारितोषिके मिळवून पुरुषोत्तम करंडकाच्या व्यासपीठावर इतिहास घडविला.Dharampeth College Nagpur गुंजन कांबळे हिला पोस्टर स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.स्पर्धेत अभय नवाथे लिखित, गुंजन कांबळे दिग्दर्शित आणि स्वप्नील बोहटे यांच्या मार्गदर्शनाखाली “काळं भूत” ही एकांकिका सादर करण्यात आली.या यशात डॉ. दीपलक्ष्मी भट आणि डॉ. मिथिला वखरे यांचे सहकार्य लाभले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा जोशी आणि उपप्राचार्या डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी विजेत्या चमूचे अभिनंदन केले.
सौजन्य : डॉ. दीपलक्ष्मी भट,संपर्क मित्र