सुभाष शुगरकडून ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी अंतिम ऊसबील वाटप सुरू

15 Oct 2025 20:38:23
हदगाव, 
Hadgaon Sugar Factory हदगाव तालुका आणि परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने शेतकर्‍यांकडून घेतलेल्या ऊसाचे अंतिम देयक वाटप सुरू केले आहे. ही प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ऊस दिलेल्या शेतकर्‍यांना प्रतिटन २८०० रुपये, तर मार्च महिन्यात ऊस दिलेल्यांना २९०० रुपये इतका अंतिम ऊसदर निश्चित करण्यात आला आहे. यांच्या मार्गदर्शनात कारखाना आल्यानंतरपासून सुभाष शुगरने सातत्याने गाळपाचा चढता आलेख राखला आहे.
 
 
sakhar
 
स्वतंत्र खाजगी मालकीचा हा Hadgaon Sugar Factory  कारखाना असल्याने, नवनवीन सहउत्पादने तयार करण्यात व्यवस्थापनाने आपले कौशल्य आणि नावीन्य दाखवले आहे. ऊस उत्पादक हेच कारखान्याचे खरे बळ मानून, त्यांना वेळेवर आणि योग्य मोबदला देण्याची बांधिलकी कारखान्याने जपली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जरी ते २० महिन्यांचा ऊस गाळपासाठी जात असला, तरी मराठवाड्यात आडसाली ऊसाची लागवड न केल्याने ऊस १२ ते १४ महिन्यांत गाळपाला जावा, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा लक्षात घेऊन गाळप क्षमता वाढविण्यासाठी यंत्रसामग्रीत मोठे बदल करण्यात आले असून, या हंगामात दैनंदिन गाळप क्षमता साडेचार ते पाच हजार टनांपर्यंत ठेवण्यात आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकर्‍याचा ऊस न उरता गाळप पूर्ण करण्याचा निर्धार कारखाना व्यवस्थापनाने केला आहे.
 
 
Hadgaon Sugar Factory शेतकर्‍यांचा ऊस गाळपाला आल्यावर सुरुवातीला प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी ते मार्च दरम्यानच्या ऊसाला प्रत्येक पंधरवड्याला ५० रुपये अतिरिक्त रक्कम देण्यात आली. त्यामुळे मार्च महिन्यात गाळप झालेल्या ऊसासाठी एकूण रुपये पहिली उचल शेतकर्‍यांना मिळाली. यानंतर फेब्रुवारीसाठी २८०० रुपये आणि मार्चसाठी २९०० रुपये अंतिम ऊसदर जाहीर करण्यात आला आहे.
 
 
तसेच, शेतकर्‍यांचा महत्वाचा सण पोळा साजरा करण्यासाठी प्रतिटन १०० रुपये, आणि आता दिवाळी सणानिमित्त आणखी १०० रुपये अशी अतिरिक्त रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण अंतिम ऊसदर २७०० रुपये प्रतिटन ठरला आहे. याशिवाय प्रोत्साहनपर रक्कम स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे. या सर्व रकमा टप्प्याटप्प्याने शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्याचे काम सुरू असल्याची माहिती चेअरमन सुभाष देशमुख यांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.
Powered By Sangraha 9.0