शेकडाे वाहनांच्या एचएसआरपी नवीन नंबर प्लेट दर्जाहीन !

15 Oct 2025 14:42:28
अनिल कांबळे
नागपूर,
HSRP Number Plate : राज्यातील सर्वच वाहनांना उच्च-सुरक्षा नाेंदणी प्लेट (एसएसआरपी) लावणे अनिवार्य करण्यात आले असून अनेकांनी आतापर्यंत नवीन नंबर प्लेट लावल्या आहेत. मात्र, एचएसआरपी प्लेट्ससाठी निश्चित केलेल्या मानक आणि गुणवत्तेपेक्षा निकृष्ठ प्लेट्स काही वाहनांना बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पैसे माेजूनही दर्जाहीन नंबर प्लेट लावून देण्यात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
 
 
HSRP
 
 
 
शासनाने वाहन चाेरी राेखण्यासाठी आणि गुन्हेगारी राेकण्यासह सुरक्षा वाढवण्यासाठी उच्च-सुरक्षा नाेंदणी प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे. या प्लेट्स एल्युमिनियमपासून बनविण्यात आल्या असून त्यात अशाेक चक्र हाेलाेग्राम, लेझर-पिन आणि स्नॅप-लाॅकसारखी वैशिष्ट्ये आहेत, जी त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी बनवलेली आहेत. नवी नंबर प्लेट बनविण्याचे कंत्राट तीन खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. राज्यातील सर्वच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट्स लावणे बंधनकारक असून मुदतीनंतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
त्यामुळे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट्स दिसत आहेत. मात्र, काही वाहनांवरील नव्या नंबर प्लेट्स गुणवत्ताहीन आणि निकृष्ठ असल्याच्या तक्रारी येत आहेत. नव्या नंबर प्लेट वाकल्या आहेत तसेच अनेकांच्या वाहनांच्या नंबर प्लेट चक्क तुटल्या आहेत. काही वाहनधारकांनी नव्या नंबर प्लेट्सबाबत कंपनीच्या फिटमेंट सेंटरकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांनी कंपनीकडून आलेल्या नंबर प्लेट लावण्याचे काम आमच्याकडे असल्याचे सांगून लगेच हात झटकून माेकळे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना फसगत झाल्याचे वाटत आहे.
 
 
कुठे करावी तक्रार ?
 
 
निकृष्ठ किंवा दर्जाहीन नंबर प्लेट वाहनाला लावून मिळाल्यास कुठे तक्रार करावी, असा प्रश्न अनेक वाहनधारकांना पडला आहे. मात्र, वाहनधारकांनी थेट एचएसआरपीची बुकिंग करण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकृत पाेर्टलवर लेखी तक्रार करावी. तेथे निकृष्ठ नंबर प्लेट आल्याचा स्पष्ट उल्लेख करावा. त्यानंतर त्या तक्रार अर्जाची प्रत काढून आरटीओ कार्यालयात तक्रार अर्ज द्यावा.
 
 
नवीन नंबर प्लेट्सचे दर
 
 
एचएसआरपी नंबर प्लेट्सचे दर वाहनाच्या प्रकारानुसार बदलतात. दुचाकीसाठी सुमारे 531रुपये तर तीन चाकी वाहनांसाठी 590रुपये लागतात. चारचाकी व माेठ्या वाहनांसाठी सुमारे 879रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही नंबर प्लेट तयार करण्यासाठी अंदाजे 180 रुपये खर्च येताे, असा दावा उच्च न्यायालयातील एका याचिकेत करण्यात आला हाेता. त्यानुसार वाहनधारकांकडून पैसे जास्त घेऊनही दर्जेदार नंबर प्लेट नसल्याची अनेकांची तक्रार आहे.
 
 
एचएसआरपी नंबर प्लेट तयार करणाèया कंपन्यांवर आरटीओ कार्यालयाचे नियंत्रण नाही. कंपनीकडून नियम आणि मानकानुसार नंबर प्लेटचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र, जर निकृष्ठ दर्जाची नंबर प्लेट असल्यास ग्राहकांनी त्या कंपनीच्या पाेर्टलवर ऑनलाईन तक्रार करावी. त्या तक्रारीची प्रत आरटीओ कार्यालयाला द्यावी. त्यानंतर आम्ही करारानुसार ती नंबर प्लेट याेग्य त्या दर्जाची आहे की नाही, याची तपासणी करु. जर ती नंबर प्लेट तकलादू असल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल.
- विजय चव्हाण (आरटीओ)
Powered By Sangraha 9.0