'बसमधये बसलोय...'; पत्नीशी बोललेले शेवटचे शब्द; त्यानंतर जिवंत जळाला

15 Oct 2025 16:20:44
जैसलमेर,  
jaisalmer-jodhpur-bus-accident राजस्थानच्या जैसलमेर-जोधपूर मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण बस आगीत वीस प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात रागडच्या पॉवर प्लांटमध्ये काम करणारा जितेश चौहानही मृत्युमुखी पडला. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच तो आपल्या घरी, पत्नी आणि मुलांकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र हा प्रवास त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
 
jaisalmer-jodhpur-bus-accident
 
बस सुटण्यापूर्वी जितेशने आपल्या पत्नीला फोन केला होता. “बसमध्ये बसलोय, लवकरच घरी पोहोचतो,” एवढंच तो म्हणाला होता. पतीच्या आगमनाची उत्सुकता असलेल्या पत्नीने काही वेळानंतर टीव्हीवर भीषण आग लागल्याची बातमी पाहिली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. वारंवार फोन करत असूनही प्रतिसाद मिळेना. दुसरीकडे तिच्या मनात वाईट विचारांची गर्दी वाढत होती. कुटुंबीयांना पोलिसांकडून माहिती मिळताच ते तातडीने जोधपूरच्या रुग्णालयात धावले. जखमींमध्ये जितेशचा शोध घेतला गेला, पण तो कुठेच आढळला नाही. jaisalmer-jodhpur-bus-accident शेवटी समजले की, या दुर्घटनेत त्याचाही अंत झाला आहे. आगीच्या तीव्रतेमुळे मृतदेह ओळखता येणे अशक्य असल्याने आता डीएनए तपासाद्वारे ओळख निश्चित केली जाणार आहे.
जितेशचा भाऊ गजेश चौहान म्हणाला, “दिवाळीचा आनंद आता कायमचा दुःखात बदलला आहे. जितेशची आठवण त्या शेवटच्या फोन कॉलमध्येच अडकून राहिली.” या भीषण घटनेत २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ प्रवासी गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर जोधपूरमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. jaisalmer-jodhpur-bus-accident प्राथमिक चौकशीत आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समोर आले आहे.
Powered By Sangraha 9.0