कॉर्पोरेट करिअरवर विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद

15 Oct 2025 16:10:28
नागपूर ,
Karmannai School of Excellence कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्स तर्फे "कॉर्पोरेट जग उलगडताना: कंपनी सचिव म्हणून करिअर" या विषयावर ज्ञानवर्धक परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील करिअर संधींबद्दल मार्गदर्शन करणे होता.सी.एस. मोनिका भट्टड आणि प्रफुलकुमार दास, कार्यकारी अधिकारी, आयसीएसआय, हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी कंपनी सेक्रेटरीच्या व्यवसायाची भूमिका, जबाबदाऱ्या, आवश्यक कौशल्ये आणि भविष्यातील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
 

unnti  
 
 
प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांनी सांगितले की, सीबीएसईने शाळांना कंपनी सेक्रेटरी कोर्सविषयी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे,Karmannai School of Excellence कारण कॉर्पोरेट क्षेत्रात पात्र व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि समर्पणाने करिअरच्या नव्या संधी शोधण्यास प्रेरित केले.अध्यक्षा प्रतिभा घाटे आणि संचालिका प्रीती कानेटकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात उत्साहाने सहभाग घेतला.
सौजन्य: डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0