अल्लीपूर,
water-supply-pipe-line-allipur चार दिवसांपासून बंद असलेल्या पाणीपुरवठा पाईप लाईनची दुरुस्ती मंगळवारी प्राधिकरणने केली असतानाच एकाच दिवसात ही पाईप लाईन लिकेज झाल्याने नवीन पाणी पुरवठा योजना फोल ठरत आहे.
ग्रामपंचायत परिसरात २ लाख क्षमतेचा जलकुंभ होता. मात्र, जिर्ण झाल्याने १ लाख क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला. लोकसंख्येच्या दृष्टीने नवीन जलकुंभातील पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यातच या जलकुंभासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे काम निकृष्ट तसेच सदोष झाल्याने भर पावसाळ्यात अल्लीपूरवासीयांना तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढून आपला रोष व्यत केला. water-supply-pipe-line-allipur यावेळी ग्रामविकास अधिकार्यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत लवकरच पाईपलाईनचे काम करून तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पाईप लाईनचे काम मंगळवार १४ रोजी करण्यात आले. मात्र, बुधवार १५ रोजी या पाईप लाईनला गळती लागल्याने दुरुस्ती कामेही तकलादू होत असल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे.
अनेक भागात नवीन पाईप लाईन सतत फुटत असल्याने चार दिवसाआड नळाला अपुरा पाणी पुरवठा होतो. पाईपलाईनचे काम पूर्णत: बोगस व निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ईस्टिमेटनुसार पाईप लाईनचे काम न झाल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करण्यात आला आहे. water-supply-pipe-line-allipur त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकर्यांकडून केली जात आहे. ग्रामपंचायतवर प्रशासक असल्याने विकास कामे थंडबस्त्यात आहेत. पाईप लाईन संदर्भात प्राधिकरणचे अधिकारी व तज्ज्ञ यांच्या समवेत ग्रामपंचायत कार्यालयात एक सर्व समावेशक बैठक घेत असल्याचे ग्रामविकास अधिकारी दिवटे यांनी सांगितले. गावात अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज् होत आहेत. पाईप लाईन चे काम निकुष्ट व बोगस झाल्याचा आरोप होत आहेत.सदर कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.