मुंबई,
Maharashtra Ladki Bhain Yojana महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून लाभ घेणाऱ्या काही महिलांना आता मोठा झटका बसणार आहे. योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने, ज्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही. यामुळे दरम्यान अनेक अर्ज रद्द करण्यात आले आहेत आणि लाभ थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. महिलांचे वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, तसेच चारचाकी वाहन नसावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. आता या निकषांसोबत ई-केवायसीची अटी जोडण्यात आल्या आहेत. दोन महिन्यांच्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता आणि १५०० रुपयांचा लाभ मिळणार नाही.
अंगणवाडी सेविकांच्या मदतीने अर्जांची पडताळणी केली जात आहे. आतापर्यंत अंदाजे ४० लाख महिलांचे अर्ज या प्रक्रियेत रद्द झाले आहेत. केवायसी पूर्ण न झालेल्या अनेक महिलांचे लाभ भविष्यातही बंद होण्याची शक्यता आहे. सरकारचा उद्देश फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा हा असल्याचे सांगितले आहे.